राज्य आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई, दि. 23 (TIN24): भूस्खलन व इतर नैसर्गिक आपत्तींनंतर प्रभावित क्षेत्रांचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यांकन करून पुनर्बांधणी, पुनर्प्राप्ती आणि दीर्घकालीन आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी शाश्वत व समन्वित उपाययोजना राबविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाणे, रायगड, कोल्हापूर, पुणे, नाशिक तसेच विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्हे पूर आणि भूस्खलनाच्या दृष्टीने अतिधोकादायक असल्याचे सांगत पूरनियंत्रणासाठी बहुआयामी दृष्टिकोन स्वीकारण्याचे निर्देश दिले. पाणी निचरा यंत्रणेत सुधारणा, पूर्वसूचना प्रणाली बळकट करणे आणि प्रभावी स्थलांतर योजना राबविण्यावर भर